अॅट्रॉसिटीचे खटले निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना
राज्यभरातील अॅट्रॉसिटीचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी विशेष न्यायलयांची स्थापना केली जाणार आहे.

मुंबई : राज्यभरातील अॅट्रॉसिटीचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी विशेष न्यायलयांची स्थापना केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विनोद तावडे आणि खासदार अमर साबळे उपस्थित होते.
ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नागपुरसह आता नाशिक आणि पुणे या 6 विभागात या विशेष न्यायालयांनी स्थापना केली जाणार आहे. पुणे आणि नाशिकमध्ये येत्या महिनाभरात ही न्यायालये कार्यान्वित होणार आहेत.
राज्यभरात 2014पासून जुलै 2018 पर्यंत अॅट्रॉसिटीचे एकूण 1341 खटले दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक- 212, कोल्हापूर- 302, औरंगाबाद- 154,कोकण- 106, नांदेड- 166, अमरावती- 203, नागपूर- 182 खटल्यांचा समावेश आहे.























