एक्स्प्लोर
Advertisement
Chhota Rajan | छोटा राजन दोषी, हत्येच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात राजनला आठ वर्ष कारावास
बाईकवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या कारला घेराव घालून त्यांच्यावर फायरिंग केली होती. यामध्ये शेट्टी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ धीरूभाई अंबानी कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मुंबई : एका व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रयत्नाबाबत दाखल खटल्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साल 2012 मध्ये हॉटेल व्यावसायिक बी.आर. शेट्टींवर यांच्यावर फायरिंग करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हत्येचा कट आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांखाली छोटा राजनसह पाच जणांना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
A Special Court in Mumbai convicts Rajendra Nikhalje alias Chhota Rajan for attempt to murder of hotelier BR Shetty. Arguments on quantum of sentence to commence later today. (file pic) pic.twitter.com/vqyKgffGML
— ANI (@ANI) August 20, 2019
छोटा राजनच्या विरोधात खटल्यांसाठी गठीत विशेष मकोका न्यायालयाने छोटा राजनसह सहा जणांना दोषी ठरवले आहे. मुंबई क्राईम ब्रांचने या संबंधी चार्जशीट दाखल केलं होतं. 3 ऑक्टोबर 2012 च्या रात्री प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक बी. आर.शेट्टी आपल्या गाडीने अंधेरीतून चालले होते. त्यावेळी बाईकवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या कारला घेराव घालून त्यांच्यावर फायरिंग केली होती. यामध्ये शेट्टी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ धीरूभाई अंबानी कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने यामध्ये अंडरवर्ल्डमधील लोकांचा समावेश असल्याचे म्हटले होते. अधिक चौकशी केल्यानंतर यामध्ये छोटा आणि आणि त्यांच्या टोळीचा समावेश असल्याची माहिती समोर आली. तेव्हापासून राजन आणि अन्य पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवला जात होता. ज्यावर आज मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
25 नोव्हेंबर 2015 ला इंडोनेशियातील बालीत राजेंद्र निकाळजे छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 वर्ष भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला 6 नोव्हेंबर 2015 ला भारतात आणलं होतं. भारतात आणल्यापासून उर्फ छोटा राजन विरोधातील देशभरातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. याआधी पत्रकार जे.डे. हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
नाशिक
Advertisement