Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकीनिमित्त सिद्धिवियानक मंदिराची जय्यत तयारी; पूजा, आरती ते प्रसादापर्यंत नियमावली जारी
Angarki Sankashti Chaturthi 2021: ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार नाही.
Angarki Sankashti Chaturthi 2021: घटस्थापनेच्या मूहुर्तावर म्हणजेच 7 ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं कोरोनाचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात आलीय. दरम्यान, अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त उद्या मंगळवारी (23 नोव्हेंबर) मुंबईतील श्री सिद्धिवियानक मंदिराच्या दर्शनासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचं भाविकांना आवाहन करण्यात आलंय.
अंगारकीनिमित्त भाविकांना मंदाराच्या सिद्धी आणि रिद्धी या दोन्ही प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन मिळणार नाही. तसेच व्हॉट्सअपद्वारे फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉर्ट दाखवणाऱ्या भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. महत्वाचं म्हणजे, भाविकांना मंदिरात हार, फुल, नारळ, पूजेची सामर्गी आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय.
भाविकांसाठी नियमावली-
- मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टी असल्यामुळे समोवार मध्यरात्री 01: 30 ते 03.00 वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जणार आहे.
- त्यानंतर मंगळवारी पहाटे 03:00 वा. ते 04.00 वा. मंदीर आरतीसाठी बंद ठेवण्यात येईल.
- मंगळवारी पहाटे 04:00 ते दुपारी 12:00 वा. मंदिर भाविकांसाठी खुले होतील.
- मंगळवारी दुपारी 12:00 वा. ते 12.30 वा मंदिर श्रींच्या नैवेद्यासाठी बंद राहील.
- मंगळवारी दुपारी 12.30 वा सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील.
- मंगळवारी सायंकाळी 07:00 ते रात्रौ 08.30 वाजेपर्यंत भाविकांसाठी दुरुन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली.
- मगळवारी रात्री 08:00 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत श्रींची महापूजा,नैवद्य व महाआरती होणार आहे.
- रात्री शेजारती नंतर भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात येईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Shani Sade Sati 2022: पुढच्या वर्षी कोणत्या राशीवर राहणार शनीची छाया? तर, शनीच्या प्रकोपातून कोणाला मिळणार मुक्ती?
- Kartik Purnima 2021 : कार्तिक स्वामींचं देशातील एकमेव मंदिर बुलडाण्यात; वर्षातून एकदाच उघडतात दारं
- कोजागिरी पौर्णिमेनिमित वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील वासुदेव मंदिर एक हजार दिव्यांनी उजळले