Shani Sade Sati 2022: पुढच्या वर्षी कोणत्या राशीवर राहणार शनीची छाया? तर, शनीच्या प्रकोपातून कोणाला मिळणार मुक्ती?
Shani Sade Sati 2022: 2020 म्हणजेच यंदाचं वर्ष हे लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. नवीन वर्षात सुख, समृद्धी लाभो, अशी सर्वांचीच अपेक्षा असते.
Shani Sade Sati 2022: 2020 म्हणजेच यंदाचं वर्ष हे लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. नवीन वर्षात सुख, समृद्धी लाभो, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. या वर्षात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं, अशीही अनेकांची भावना असते. दरम्यान, ज्योतिष शास्त्रानुसार 2022, हे वर्ष काही राशींसाठी आनंदाचे ठरणार आहे. तर, काही जणांना शनिच्या प्रकोपापासून मुक्तता मिळणार आहे. याशिवाय, कोणत्या राशीवर शनिची छाया राहणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो. शनिदेव हे देखील इतर ग्रहांमध्ये संक्रांत करतात. परंतु, त्यांचा वेग अतियश कमी असतो. शनीला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. परंतु, या कालावधीत अनेकांना शनिच्या ढैय्या आणि साडे सातीसारख्या परिस्थितीला सामोरं जावा लागतं. या काळात अनेकांना अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
यातच पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये शनि सुमारे अडीच वर्षांनी आपली राशी बदलणार आहे. शनिचा हा राशी परिवर्तन 29 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. यादरम्यान शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळं धनु राशीच्या लोकांना शनि सतीपासून मुक्ती मिळेल. तर, मीन राशीच्या लोकांची शनी साडेसाती सुरू होईल. याशिवाय, शनिध्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर होईल. दुसरीकडे, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना यापासून मुक्ती मिळणार आहे.
2022 मध्ये मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीचे लोक शनिच्या सावलीत असतील. दुसरीकडे, मेष, वृषभ, सिंह आणि कन्या राशीचे लोक शनीच्या प्रकोपापासून पूर्णपणे मुक्त होतील.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-