एक्स्प्लोर

शिवसेना आमदारांची कामं न झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, उद्धव ठाकरेंचे संकेत

मुंबई : शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील काम झाली तर ठीक, अन्यथा शिवसेना सत्तेतून पाठिंबा काढून घेईल, असे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. संतप्त आमदारांच्या प्रतिक्रियेनंतर पाठिंबा काढून घेण्याचे संकेत उद्धव यांनी दिले असले, तरी बाहेर पाठिंबा देणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.   शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद यांची आमने-सामने बैठक   शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली. शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद यांची आमने-सामने बैठक झाली. या बैठकीत आमदारांच्या तक्रारींवर शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्धव ठाकरेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती मिळते आहे.   शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांची कामं होत नाहीत!   शिवसेनेचे विधान परीषदेतील मंत्री शिवसेनेच्याच आमदारांच्या मतदारसंघातील कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमदारांनी तक्रार केली होती. सत्तेत असुनही शिवसेना आमदारांची कामं होते नाहीत. विशेष करून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या मंत्र्यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.   सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंची तक्रार   या बैठकीत नाराज आमदारांचे प्रश्न विभागीय प्रतोदांनी उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांसमोर मांडले. एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी नाहीत. मात्र, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी असल्याचे प्रतोदांनी सांगितले.   देसाई-रावतेंनी मांडली स्वत:ची बाजू   त्यावेळी सुभाष देसाई यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. मे 2016 च्या आधी शिवसेना आमदारांनी सांगितलेली सर्व कामे आपण केल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. दिवाकर रावते यांनी देखील स्वतःची बाजू मांडली.   उद्धव ठाकरे स्वत: कामांचा पाठपुरावा करणार   मंत्री आणि प्रतोद याच्यासोबत समोरासमोर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामं त्यांच्या विभागीय प्रतोदांकडे देण्यास सांगितले. विभागीय प्रतोद आणि उद्धव ठाकरे स्वत: या कामांचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.   शिवसेनेचे प्रतोद मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार   शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांच्या संदर्भात शिवसेनेचे प्रतोद आणि मुख्यमंत्री यांची लवकरच एक बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांची कामं मार्गी लावण्यासाठी काय करता येईल, याबद्दलचा निर्णय होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget