एक्स्प्लोर

Datta Dalvi : बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचा शिलेदार, थेट मुख्यमंत्र्यांना म्हणाले भोXXX, कोण आहेत दत्ता दळवी? 

Who Is Datta Dalvi : बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या दत्ता दळवींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  

मुंबई : शिवसैनिक म्हणजे शिवराळ भाषा, त्यातही बाळासाहेब ठाकरेंसोबत (Balasaheb Thackeray) ज्यांनी काम केलं आहे त्या शिवसैनिकांची भाषाही आणि संस्कारही बाळासाहेबांसारखेच. आता हा विषय पुन्हा चर्चेत आला म्हणजे दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्यामुळे. दत्ता दळवी यांची ओळख फक्त मुंबईचे माजी महापौर अशी नाही. तर बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर आणि कडवट शिवसैनिक, धाडसी आणि आक्रमक शिवसैनिक ही त्यांची पहिली ओळख. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकेकाळचे सोबती आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दत्ता दळवींनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे शिवीगाळ केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक कडवट शिवसैनिक तयार केले. त्यामध्ये दत्ता दळवी यांचे नाव पहिल्या यादीत येतं. भांडुपमध्ये रविवारी शिवसेनेचा ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात शिवीगाळ केली. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर दत्ता दळवी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

कोण आहेत दत्ता दळवी? (Who Is Datta Dalvi) 

बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. 

सन 2018 साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच शिवी दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. 

दत्ता दळवींना अटक, जुने शिवसैनिक चार्ज होणार का? 

या आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाहीरपणे टीका केली होती. आता दत्ता दळवींनी शिवराळ भाषेत वक्तव्य करत थेट मुख्यमंत्र्यांनाच अंगावर घेतलं आहे. पण त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही शिंदे गटाला फायदेशीर ठरणार की ठाकरे गटाच्या जुन्या शिवसैनिकांना चार्ज करणार हे पाहावं लागेल. कारण दत्ता दळवींच्या अटकेनंतर आता ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. 

दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी,294, 504,505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे. मात्र आज जामीन घेत असताना देखील सूडबुद्धीने विलंब केला जातोय असा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget