एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, गुन्हा दाखल
![शिवसेना नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, गुन्हा दाखल Shivsena Corporater Beaten Bmc Engineer शिवसेना नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/02/03171243/bmc-01-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: नालेसफाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या नगरसेवकानं मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी जी उत्तर विभागाचे दुय्यम अभियंता प्रीतम वनारसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. धारावी क्षेत्रातल्या नालेसफाईच्या कामावर विशिष्ट कामगार घ्यावेत यासाठी ही मारहाण केल्याचं प्रितम वनारसे यांनी म्हटलं आहे.
तर नालेसफाईचं काम योग्यरितीनं पार पडत नसल्यानं बाचाबाची झाल्याचं स्पष्टीकरण राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)