(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याबद्दल संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी (shiv sena dasara melava) मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी (shiv sena dasara melava) मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे. यंदा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही, असं ते म्हणाले. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीनं पार पडला होता. राऊत म्हणाले की, यंदाचा ॲानलाईन पद्धतीने होणार नाही, तर प्रत्यक्ष पद्धतीने मेळावा होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील, असं ते म्हणाले.
Lakhimpur Kheri : आणखी कोणता पुरावा हवा? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ समोर
संजय राऊत म्हणाले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात राजकारण काय, हे विरोधकांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. राहुल गांधींना जाऊ दिले जाणार नाही. लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जातेय. सरकार विरोधी बोलणा-यांना देशद्रोही ठरवलं जातंय, असा आरोप देखील संजय राऊतांनी केला.
Lakhimpur Kheri Violence : हिट अँड 'रण', विरोधक आक्रमक; शरद पवार, संजय राऊत यांनी केंद्राला सुनावलं
संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं की, देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झालीय. लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक आहे. मोदींना गांधी घराण्याची भिती वाटतेय. म्हणून प्रियांका गांधींना अडवलं जातंय. योगींनी राजीनामा द्यायला पाहीजे. मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला जाताहेत पण अमृत महोत्सव रक्तानं माखला आहे, असंही राऊत म्हणाले.
स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का?
सामनाच्या अग्रलेखातून टीका करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही. देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?,” असा सवाल या अग्रलेखात केला आहे.