एक्स्प्लोर

Indrani Mukerjea : इंद्राणी मुखर्जीची हायकोर्टात याचिका, तुरुंगात झालेल्या दंगलीप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी

Sheena Bora Murder Case : मंजुळा शेट्ये या वॉर्डनला झालेल्या अमानुष मारहाणीनंतर महिला कैद्यांनी जेलमध्ये दंगल केली होती. त्या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे.

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी नुकताच जामीन मिळालेल्या इंद्राणी मुखर्जीनं पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भायखळा महिला कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये प्रकरणानंतर कारागृहात कैद्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांवर नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्येला 23 जून 2017 रोजी अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर 24 जून 2017 रोजी मंजुळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारागृह अधीक्षक मनीषा पोखरकरसह पाच महिला अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला होता. मंजुळाच्या हत्येची बातमी कळाल्यानंतर कारागृहातील महिला कैद्यांनी तुरुंगात तोडफोड आणि जाळपोळ करत हिंसक आंदोलन केलं होतं. हे आंदोलन पेटवण्यामागे इंद्राणी मुखर्जीसह काहींचा समावेश असून 220 हून अधिक महिलांचा सहभाग असल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कालांतराने हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. 

आरोपींनी आंदोलनात कारागृहातील सीसीटीव्ही तोडल्यामुळे तपासासाठी हे सीसीटीव्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. याप्रकरणी कारागृहातील महिला कैद्यांना तोडफोड आणि जाळपोळ करण्यास पोलिसांवर प्लेट्स आणि भांडी फेकण्यास प्रवृत्त करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे विविध गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत अँड. सना खान यांच्यामार्फत इंद्राणीनं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. 

मंजुळा शेट्येच्या हत्येनंतर कारागृहातील उद्रेकात अथवा कारागृहात उपद्रव निर्माण करण्यात आपला कोणताही सहभाग नव्हता. आपल्यावरील आरोप हे चुकीचे आणि अस्पष्ट असल्याचा दावाही इंद्राणीनं या याचिकेतून केला आहे. केवळ आपल्याला आणखीन त्रास आणि छळण्याच्या उद्देशानं या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही इद्राणीनं या याचिकेत केला असून त्यावर बुधवारी सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 10 March 2025Zero Hour | Raj Thackeray Ganga Statement | राज ठाकरेंचं 'ते' विधान, कुणाचं समर्थन, कुणाचा विरोध?Ravindra Dhangekar Join Shivsena | धंगेकरांंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेस सोडण्यामागील कारण काय? काँग्रेस नेते काय म्हणाले?Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | संदीप क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी? प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Embed widget