एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीला शरद पवारांचा दुजोरा
या भेटीबाबत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी शरद पवारांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई : सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. दहा दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीला शरद पवारांनी देखील दुजोरा दिला आहे.
या भेटीबाबत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी शरद पवारांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पवारांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यामुळे या भेटीचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. या भेटीमुळे भाजपचे देखील धाबे दणाणले आहेत.
उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी विविध पक्षाचे नेते ‘मातोश्री’ गाठतात ही परंपरा आहे.
मात्र, आता उद्धव ठाकरे मातोश्रीचा उंबरठा ओलांडून भाजपविरोधकांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींची भेट घेतली होती.
संबंधित बातम्या :
सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement