एक्स्प्लोर
संपादकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप, तरुणीकडून प्रियकराच्या मदतीने हत्या
संपादक नित्यानंद पांडे आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता मिश्रा हिचा गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. या शोषणाला अंकिता मिश्रा कंटाळली होती. अखेर आरोपी अंकिता मिश्रा आणि प्रियकर सतिश मिश्राने नित्यानंद पांडे याचा हत्या करण्याचा कट रचला.

काशिमीरा : इंडिया अनबाऊंडचे संपादक नित्यानंद पांडे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता मिश्रा आणि अंकिताचा प्रियकर सतिश मिश्रा या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काशीमीरा लोकल क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. संपादक नित्यानंद पांडे आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता मिश्रा हिचा गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. या शोषणाला अंकिता मिश्रा कंटाळली होती. अखेर आरोपी अंकिता मिश्रा आणि प्रियकर सतिश मिश्राने नित्यानंद पांडे याचा हत्या करण्याचा कट रचला. 15 मार्च रोजी दोघांनी नित्यानंद पांडेला उत्तन येथे नेले. संध्याकाळी जवळपास 6.30 वाजता दोघांनी गळा दाबून पांडे यांची हत्या केली. नंतर पांडे यांचा मृतदेह भिवंडी येथील नाल्यात टाकून फरार झाले होते. अखेर त्यांना अटक करण्यात आली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























