Maharashtra Politics : 23 जागांवर लढायची शिवसेनेची भूमिका! महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसफुस? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
Sanjay Raut on NCP, Congress, Shiv Sena : महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Seat Sharing in MVA Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागा वाटपासंदर्भात (Seat Allocation) वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत, त्याबाबत शिवसेना (Shiv Sena) खासदार (Shivsena MLA) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ''मी अधिक स्पष्ट करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की, आमच्यात मतभेद आहेत. आमच्यामध्ये जागा वाटपावरून धुसफुस आहे, पण असं अजिबात नाही. तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि त्या जागांचे वाटप मेरिटनुसार होईल. आमचे सूत्र पहिल्यापासून आहे, जिंकेल त्याची जागा'', असं राऊतांनी म्हटलं आहे.
''23 जागांवर लढायची शिवसेनेची भूमिका''
जागा वाटपाच्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ''शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून राहिली आहे. 23 जागांवर लढायचं चर्चा सुरू आहे. एखाद्या जागेसंदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दावा मजबूत असेल तर, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते. मी उपस्थित होतो, उद्धवजी उपस्थित होते, सुभाष देसाई उपस्थित होते. चर्चा जागा वाटपावर झाली. राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढू शकते, त्यांची बलस्थान कुठे आहेत, यावर चर्चा झाली. चर्चा उत्तम झाली, त्यातून एक दिशा स्पष्ट झाली की, राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढायला इच्छुक आहे. अशा काँग्रेससोबत देखील चर्चा होतील. आम्हाला आमची ताकद माहिती आहे.''
काँग्रेस फॉर्मुल्याबाबत संजय राऊत काय म्हणाले?
आमची चर्चा काँग्रेससंदर्भात दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांसोबत सुरू आहे, असंही संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, ''वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. वंचित आपल्यासोबत येऊ नये, अशी शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठलीही भूमिका नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे देखील तेच म्हणणं आहे. अशा कुठल्याही फॉरमुलावर चर्चा होत नाही, जयंतराव पाटील बसले होते, त्यांच्याजवळ कुठलाही फॉर्मुला नव्हता.''
''जिंकेल, त्याची जागा''
जिंकेल त्याची जागा, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ''तीन पक्षाचे हे सूत्र आहे आणि हे सूत्र संपूर्ण देशभरातला आहे. या देशातील साडेतीनशे जागांचं हे सूत्र आहे. 2024 साठीचा हा संकल्प आहे की, महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुन्हा एकदा शिखरावर न्यायचं शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आणि शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करायचा हा आमचा संकल्प आहे स्वप्न आहे. या देशातील हुकूमशाहीचा नायनाट करायचा हा आमचा संकल्प आहे.''
'...त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल'
''शुक्रवारी जयंतराव आमच्यासोबत होते, त्यासंदर्भात चर्चा झाली. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांना स्वतःचं अस्तित्व नष्ट करून राजकीय अस्तित्वासाठी त्यांना भाजपात विलीन व्हावे लागेल, हे सत्य आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. काही लोक अफवा पसरवत आहेत. आमच पहिलंच सूत्र आहे की जिंकेल त्यांची जागा. त्यामुळे कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीत काहीच धुसफुस नाही. 48 जागा मेरीटनुसारच होणारच. जागा वाटपासंदर्भात जयंत पाटीलांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली.'' असंही संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे.