Mumbai News : सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू, दोन डॉक्टरांचे निलंबन
Saint George Hospital : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश दिले असून या प्रकरणी ते विधीमंडळात बैठकही घेणार आहेत.
मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालयातील (Saint George Hospital) कर्मचाऱ्यालाच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे कारवाईचे आदेश दिले अशून या प्रकरणी ते गुरुवारी दुपारी विधीमंडळात बैठकही घेणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. अनिस चव्हाण असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यालाच वेळेवर उपचार न मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मृताचे नातेवाईक आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर डॉक्टर आणि व्यवस्थापनाशी वाद घातल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते.
रुग्णालयात गोंधळाचं वातावरण
सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीय आणि सहकर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाचं वातारण निर्माण झालं होतं. त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते.
राहुल नार्वेकरांनी बैठक बोलावली
सेंट जॉर्ज रुग्णालय घटनेप्रकरणी तातडीने कारवाई करत दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरूवारी दुपारी 12 वाजता एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ही बातमी वाचा: