एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये साईबाबांच्या मुकुटाची चोरी, प्रकार सीसीटीव्हीत कैद
ठाणे : उल्हासनगरमधील साईमंदिरातून साईबाबांचं चांदीचं मुकुट चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
उल्हासनगरातील कॅम्प नं. 4 येथील ओटी सेक्शन परिसरात पंचायत हॉल समोर नगरसेविका लिलाबाई आशान यांनी बांधलेले साईधाम हे साईबाबाचे मंदिर आहे.
दुपारच्या सुमारास एका अज्ञात तरूणाने दर्शन घेण्याच्या बाहण्याने मंदिरात प्रवेश करून साईबाबाचे व गणपतीचे चांदीचे मुकुट तसेच चांदीची छत्री अशा जवळपास पावणे दोन किलो चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.
मंदिरात बसवण्यातआलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात त्या चोरटयाची छबी कैद झाली आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विठठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा मंदिरात चोरी झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement