Mumbai High Court: कर्करोगग्रस्त आजोबांना दिलासा; सासूची सूनेविरोधातील याचिकी हायकोर्टानं स्वीकारली, अटी-शर्तींवर घरातील कुलदैवतेचं दर्शन घेण्याची विनंती मान्य
Mumbai High Court: कर्करोगग्रस्त आजोबांना दिलासा मिळाला आहे. सासूची सूनेविरोधातील याचिकी हायकोर्टानं स्वीकारली असून अटी-शर्तींवर घरातील कुलदैवतेचं दर्शन घेण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे.
Mumbai High Court News : मुंबई : डोळे बंद होण्याआधी मूळ वडिलोपार्जीत घरातील कुलदैवतेचं दर्शन घेण्यास 77 वर्षीय आजोबांना हायकोर्टानं (High Court) सशर्त परवानगी दिली आहे. याप्रकरणी हायकोर्टाचं दार ठोठावणाऱ्या सासूनं केलेली विनंती अखेर सुनेनं मान्य केली आहे. सासू-सासरे घरात कधी येतील, पूजेचं साहित्य कोण देईल? यासाठी अटींची एक यादी तयार करण्यात आली. यावर सासू आणि सूनेचं एकमत झालं आहे. सून सध्या परदेशी निघून गेली आहे. न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली होती.
काय असतील अटी-शर्थी?
- संपूर्ण पूजेचं व्हिडीओ शुटींग केलं जाईल.
- पूजेचं साहित्य सून देईल.
- घरात काही वैद्यकीय मदत लागल्यास ती दिली जाईल.
- कुणालाही देव काढून नेता येणार नाहीत.
- 4 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता सासू- सासऱ्यांना घरात येता येईल. सासऱ्यांच्या प्रकृतीनुसार वेळेमध्ये बदल करता येईल.
काय आहे प्रकरण?
अॅड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत सासूनं यासंदर्भात हायकोर्टात याचिका केली होती. सासू पतीसोबत पेणमध्ये सध्या नातलगांकडे वास्तव्य करत आहे. त्यांचे तिथून काही अंतरावर वडिलोपार्जीत 90 वर्षे जुनं घर आहे. त्याच घरात त्यांच्या कुलदैवता आहेत. त्यांची सून याच घरात राहते, ही सून सतत इतरांशी वाद घालायची. अखेर तिनं सासू सास-यांना घराबाहेर काढलं. गेल्यावर्षी तिच्या सास-यांना कर्करोगाचे निदान झालं असून त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे घरातील कुलदैवतांचं दर्शन घेऊन त्यांची पुजा करायची आहे, अशी विनंती सासूनं सुनेकडे केली होती. मात्र तिनं त्यांना घरात प्रवेश नाकारला. यात पोलिसांकडेही मदतीची विनवणी केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर आपल्याच घरात प्रवेश देण्याची विनंती करत सासूनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :