Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, टोलनाके पेटवू;आक्रमक मनसैनिक मैदानात, विनाटोल गाड्या सोडल्या!
अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली.
![Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, टोलनाके पेटवू;आक्रमक मनसैनिक मैदानात, विनाटोल गाड्या सोडल्या! Raj Thackeray warning MNS aggressive started leaving four wheeler vehicles without toll Avinash Jadhav Mulund airoli navi mumbai Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, टोलनाके पेटवू;आक्रमक मनसैनिक मैदानात, विनाटोल गाड्या सोडल्या!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/e2efac26df66058565c870a1bf5fde91169684015881889_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलबाबत (Toll) घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक (MNS supporters) मैदानात उतरले आहेत. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोलनाक्यावरुन उतरून, लहान वाहने विनाटोल सोडले.
अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. तिकडे मनसैनिकांनी जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर (Mumbai - Pune highway) असलेल्या शेडूंग टोल नाका (Shedung Toll) येथे आंदोलन सुरु केलं. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले.
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
जी घोषणा आम्ही टोलमुक्तीची केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
अविनाश जाधव यांचं पाच दिवस उपोषण
मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलवाढीविरोधात 5 दिवस उपोषण केलं. मात्र राज ठाकरे यांच्या आग्रहानंतर रविवारी 8 ऑक्टोबरला अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतले. आतापर्यंत गांधींचा मार्ग आम्ही अवलंबला, यासंदर्भात मार्ग न निघाल्यास भगतसिंह यांचा मार्ग आम्हाला अवलंबवावा लागेल अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केली होती.
हे ही वाचा :
MNS chief Raj Thackeray: राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, फडणवीस-अजित पवारांचे व्हिडीओ दाखवले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)