Raj Thackeray : मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचा मंच कोसळला. या अपघातात राज ठाकरे सुरक्षित असल्याचे समोर आले.
![Raj Thackeray : मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित Raj Thackeray's tage collapsed in goregaon mumbai during raj Thackeray program Raj Thackeray : मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/b7b9d00b04b51f04f2db0198e6b9ea23_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले आहे. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे व इतर नेते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोरेगाव येथे मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठ कोसळले तेव्हा राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
आज मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव पूर्व येथे दाखल झाले. यावेळी स्थानिक पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी होती. राज ठाकरे आणि मनसेचे इतर पदाधिकारी असताना व्यासपीठावर असताना अचानक मंच कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. राज ठाकरे व इतर पदाधिकारी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी घाटकोपरमधील कामराज नगरच्या मनसे शाखा उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकविण्याच वचन यावेळी उपस्थित मनसैनिकांनी राज ठाकरे यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत मनसेची प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील आहेत. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या सात जागा निवडून आल्या होत्या. मात्र, त्यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray: राज ठाकरे आता फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी न लावण्याचा आदेश
- Shiv Jayanti : मनसे शिवजंयती तिथीनुसार साजरी करणार, राज ठाकरे यांनी सांगितले 'हे' कारण!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)