एक्स्प्लोर

Raj Thackeray : मराठी भाषा दिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा! मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच...

Marathi Bhasha Gaurav Din 2024 : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Raj Thackeray on Marathi Movie : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात साधारणपणे 15 कोटी मराठी लोकसंख्या आहे. दीड-पावणे दोन कोटी बाहेरचे आहेत, बाकी मराठीच आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर प्रेक्षक पाहायला का जात नाही. आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कात टाकणं आवश्यक : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, ''जी गोष्ट मला टीव्हीवर मोफत पाहता येते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, त्यामुळे ते चालतात. कात टाकणं आवश्यक आहे.'' 

चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत बदल गरजेचा

साधारणपणे 30 वर्षांपूर्वी राजकारणी लोक कोकणात जाऊन सांगायचे की, आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि मग लोक त्यांना मतदान करायचे. पण, ज्या दिवशी लोकांनी टीव्हीवर 'बेवॉच' चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना कळलं की, हे आपल्याकडे नाही आणि कोणत्याही राजकारणीने आतापर्यंत हे आणण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजकारणी फसवत आहेत. त्यामुळे राजकारणी सुधारले, त्याप्रमाणे चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीने कात टाकणं आवश्यक आहे. 

नवीन कल्पना, नवीन संकल्पना

नवीन संकल्पना, नवीन कल्पना येणं, गरजेच आहे. त्यासाठी माझ्याकडून जे काही हातभार लागेल, त्या-त्या वेळी मी निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. मराठी भाषा दिन साजरा करणं मी आणि माझ्या पक्षाने 2008 मध्ये सुरु केलं, त्याआधी फक्त मराठी भाषा दिवस होता, तो साजरा करणं आम्ही सुरु केलं. आता हा दिवस साजरा होतो, मोठा होतो, तो वाढतोय.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न

मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे, ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडून होईल, ते करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच ते समोर येईल. 

'तिकीटालय' ॲप लाँच

दरम्यान, मराठा भाषा दिनानिमित्त 'तिकीटालय' ॲप लाँच करण्यात आला. मराठी नाटक, चित्रपट आणि कार्यक्रम बुकिंगसाठी तिकिटालय अँप तयार केलं आहे. इतर अँपवर मराठी कार्यक्रम कमी असतात. मात्र या अँप मध्ये सर्व सविस्तर कार्यक्रमाची माहिती आहे.

 महत्त्वाच्या इतर बातम्या : 

NCP Sharad Pawar and MNS : 'मनसे नामशेष होण्याच्या मार्गावर', शरद पवार गटाचा राज ठाकरेंवर पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
Census In India : मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार
ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar- Yugendra Pawar : पवार विरूद्ध पवार; आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणारBhavna Gavali Washim : वाशिमच्या रिसोड मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 28 October 2024Sangli Mahayuti : सांगलीत पृथ्वीराज पाटलांना तिकीट; जयश्री पाटील नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
Census In India : मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार
ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
Bandra Terminus :  19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Embed widget