ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 28 October 2024
सकाळी ९ च्या हेडलाईन्स मराठी न्यूज हेडलाईन्स 9AM TOP Headlines 09 AM 28 October 2024
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास पुन्हा सुरुवात, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवारांसह अमित ठाकरेही भरणार अर्ज
बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार आज भरणार उमेदवारी अर्ज, अजित पवार कण्हेरी मारुतीच्या दर्शनानंतर करणार शक्तिप्रदर्शन तर युगेंद्र साधेपणाने भरणार अर्ज
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात
माहीम मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर, अमित ठाकरेंसाठी महायुतीतील काही जण आग्रही
सदा सरवणकर उद्या भरणार अर्ज, मुलगा समाधान सरवणकरांचं व्हॉट्सअॅप स्टेटस, तर दीपक केसरकर म्हणतात अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचे कर्तव्य
सोलापुरात महायुतीत तिढा, ३ मतदारसंघात भाजपविरोधात शिंदे गटाची अपक्ष उमेदवारी, सोलापूर दक्षिणमध्ये मविआतील काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने