एक्स्प्लोर

Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे

Amit Thackeray On Uddhav Thackeray: अमित ठाकरे यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Amit Thackeray On Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे आज उमेदवारी भरणार आहेत. अमित ठाकरे सकाळी नऊ वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करतील, अशी माहिती समोर आली आहे.

अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराला जोरदार सुरुवात देखील केली आहे. याचदरम्यान त्यांच्या एका विधानाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अमित ठाकरेंनी साम या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.  मी आजारी होतो तेव्हा मला माहित होतं की, माझे वडील काय आहेत या फोडाफोडीचा त्यांना काही फरक पडणार नव्हता आणि ते पुढे काय करू शकतात हेही मला माहीत होतं. पण त्यावेळी नैतिकता पाळली गेली नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. 

माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे

आता ते बोलतात की, मी आजारी असताना माझे 40 आमदार फोडले, तेव्हा मी आजारी असताना तुम्ही सहा नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला तुमची चूक दिसली नाही का?, असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच दोन भाऊ एकत्र यावे हे जे मला अगोदर वाटत होतं ते या प्रकारानंतर पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघून गेलं, आता मला तसं अजिबात वाटत नाही. तो विषय माझ्यासाठी तरी संपलेला आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

मी राज ठाकरेंकडून हे शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमित ठाकरे

बाळासाहेबांबरोबर राज ठाकरे दोन-तीन वर्षाचे असल्यापासून फिरत होते. त्यांनी अनेकदा सांगितलं पण होतं की शाळेत प्रिन्सिपल ने बोलावल्यावर त्यांचे वडील जाण्याऐवजी बाळासाहेब जायचे एवढे त्यांचे नातेसंबंध दृढ होते. कोणत्याही आमदाराचे खासदाराचे किंवा नगरसेवकाचे जर अचानक दुःखद निधन झाले तरी आपण तिथे कधीच उमेदवार देत नव्हतो कारण बाळासाहेब यांची ही शिकवण होती की ती त्यांची जागा ही त्यांच्या घरातल्याच कोणालातरी मिळायला हवी, हे संस्कार राज ठाकरेंवर आहेत आणि मी त्यांच्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

संबंधित बातमी:

Amit Thackeray: '...तर आम्हीही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नसता'; अमित ठाकरेंनी थेट जाहीर करुन टाकलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget