Sangli Mahayuti : सांगलीत पृथ्वीराज पाटलांना तिकीट; जयश्री पाटील नाराज
Sangli Mahayuti : सांगलीत पृथ्वीराज पाटलांना तिकीट; जयश्री पाटील नाराज
सांगली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी केली आहे. सांगली विधानसभेत काँग्रेस मध्ये बंडखोरी झालीय तर शिराळा आणि जत विधानसभामध्ये भाजपात बंडखोरी झालीय. यामध्ये सांगली विधानसभा मध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज पाटील यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज होत बंडखोरी केलीय. तर शिराळा मध्ये भाजपमधून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी भेटल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय.. जत विधानसभा मध्ये भाजपकडून।गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी भेटल्याने तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केलीय. आता या बंडखोरी शेवटपर्यंत राहतात का आणि जरी बंडखोरी कायम राहिली तर ती कुणाला अडचणीची ठरणार हे पाहावे लागणार आहे.























