एक्स्प्लोर
प्रवाशांना मारहाण करणाऱ्या रेल्वे पॅन्ट्रीकारच्या 5 कर्मचाऱ्यांना अटक
मुंबई: रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये मुंबईतल्या जोडप्याला मारहाण करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली असून यातील 5 आरोपींना आज रेल्वे कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. यानंतर पाचही आरोपींची ओळख परेड होणार आहे.
22 मेला मथुराहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रदीप गुप्ता आणि त्यांच्या पत्नीला पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. यात गुप्ता दाम्पत्याच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली होती. अधिकृत रेल नीर कंपनीचं पाणी का दिलं नाही हे विचारल्यामुळे गुप्ता दाम्पत्याला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती.
काय आहे प्रकरण:
भाईंदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
हा प्रकार घडत असताना एका सहप्रवाशाने याचं चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केलं. यानंतर रेल्वेच्या ट्वीटर हँडलवर या प्रकाराची गुप्ता यांच्या मित्राने तक्रार दाखल केली. ज्यावर तात्काळ कारवाई करत गुजरातच्या रेल्वे पोलिसांनी पँट्रीकारच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement