एक्स्प्लोर

Pune Ganapati Visarjan Case : पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका हायकोर्टानं फेटाळली, याचिकाकर्त्यांना दिलासा नाहीच

Pune Ganapati Visarjan Case : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली. याचिकाकर्त्यांना कोणताही ठोस दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार.

Pune Ganapati Visarjan Case : पुणे (Pune) गणपती विसर्जन (Ganapati Visarjan 2022) मिरवणूक याचिका हायकोर्टानं (Bombay High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलं आहे.

पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवासांवर आला आहे. अशातच मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत बढाई यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. हायकोर्टात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. 

पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. पुण्यातील हजारो मंडळं सुंदर असे विसर्जन रथ तयार करून, त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मिरवणुकीत मनाच्या पाच गणपतींचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं. पोलीस आणि प्रशासनाकडे याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्यानं पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या या वादाला मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे, 1894 ला पुण्यातील गणेश मंडळांमध्ये आधी विसर्जन कोणी करायचं यावरून वाद निर्माण झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचल्यावर पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असं ठरलं. पुढे तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांना राहील अशी प्रथा रूढ झाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
Bihar Election : मोठी बातमी, महागठबंधन बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह रिंगणात उतरणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
महागठबंधन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chakan Traffic Protest|वाहतूक कोंडीविरोधात चाकणमध्ये मोर्चा,Amol Kolhe यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक
Dombivli Palava City Security Guard | अल्पवयीन मुलांना मारहाण, गुन्हा दाखल
Bank Check Theft | सोलापूरच्या Bank of Maharashtra मधून ४ लाखांचा चेक चोरी
Land Dispute| Chandrapur: Meshram कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला, जमिनीचा वाद कायम
Maharashtra Power Strike | वीज कंपन्यांचा ७२ तासांचा संप, सरकारकडून MESMA लागू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
Bihar Election : मोठी बातमी, महागठबंधन बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह रिंगणात उतरणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
महागठबंधन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच  ट्विस्ट
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच ट्विस्ट
Mohammed Shami: टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
Chirag Paswan : माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
Embed widget