Chirag Paswan : माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
Bihar Election 2025 : लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान आणि हम पक्षाचे जीतन राम मांझी यांच्या भूमिकेमुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाल्याचं चित्र आहे.

पाटना : बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election 2025) जाहीर होऊन तीन दिवस झाल्यानंतरही भाजप प्रणित एनडीए (NDA) आणि महागठबंधन (Mahagathbandhan) दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपावरुन (Seat Sharing) गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. एनडीएमध्ये चिराग पासवान (Chirag Paswan) आणि HAM प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी केलेल्या मागण्यांमुळे अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही.
चिराग पासवान यांनी भाजपकडे 30 हून जास्त जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागावाटपाचं घोडं अद्यापही अडल्याचं दिसतंय. आपल्याकडे केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी असल्याने त्यामध्ये व्यस्त आहोत, त्यामुळे जागा वाटपाची चर्चा होत नसल्याचं कारण चिराग पासवान यांनी दिलं. दरम्यान, नित्यानंद राय (Nityanand Rai) आणि विनोद तावडे यांच्यावर चिराग पसवान यांना समजावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jitan Ram Manjhi : हम पक्षामध्येही नाराजी
हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी 15 जागांची मागणी केली आहे, मात्र भाजप त्यांना फक्त आठ जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे एनडीएमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागा वाटपाची अधिकृत घोषणा 11 किंवा 12 ऑक्टोबरला होऊ शकते.
Bihar Mahagathbandhan Seat Sharing : महागठबंधनातही ताणतणाव
महागठबंधनामध्येही परिस्थिती वेगळी नाही. वीआयपी प्रमुख (VIP Party Chief) मुकेश सहनी (Mukesh Sahani) आणि काँग्रेस (Congress) पक्ष आरजेडी (RJD) सोबत जागा वाटपावर चर्चा करत आहेत. काँग्रेस यावेळी जिंकण्याच्या शक्यता असलेल्या जागांवर लक्ष केंद्रीत करत असून त्यांनी 55 जागांची मागणी केली आहे.
BJP Strategy Bihar : बीजेपीची रणनीती
भाजपचे वरिष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), विनोद तावडे (Vinod Tawde) आणि मंगल पांडे (Mangal Pandey) हे दिल्लीमध्ये चिराग पासवान यांच्याशी दुसऱ्या फेरीची चर्चा घेणार आहेत. दुसरीकडे, नाराज जीतन राम मांझींना शांत करण्यासाठी खुद्द जेपी नड्डा (JP Nadda) यांनी हस्तक्षेप केला आहे.
JDU Bihar Election : जेडीयूची तयारी
जेडीयू (JDU) सुमारे 102 जागांवर उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. पक्षाने 30 जागांवर उमेदवार निश्चित केले असून मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संमतीनंतर घोषणा होईल. काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला (Seat Sharing Formula) अजून निश्चित झालेला नाही. एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही बाजूंनी राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये बिहारच्या राजकारणात मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात.
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
ही बातमी वाचा:
























