एक्स्प्लोर
Bank Check Theft | सोलापूरच्या Bank of Maharashtra मधून ४ लाखांचा चेक चोरी
सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीपेठ शाखेतून चार लाखांचा चेक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याचा चेक अज्ञाताने चेक बॉक्समधून पळवला. बँकेने आपल्या तक्रारीत अमर तेपेदार नावाच्या व्यक्तीने हा चेक चोरल्याचं म्हटलं आहे. चेकच्या स्लिपमध्ये बँक खात्याचा नंबर चुकीचा टाकल्याचे सांगून त्याने ड्रॉप बॉक्स उघडायला लावला आणि बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चेक चोरल्याचा आरोप आहे. बार्शीतील शेतकरी उत्तम जाधव यांना सोयाबीनचे बिल म्हणून हा चेक मिळाला होता. बँकेतून चेक गायब झाल्याने जाधव कुटुंब चिंतेत आहे. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, "जे फ्रॉडस्टर आहेत, त्यांनी चेकमध्ये काही करेक्शन्स करायची किंवा आणखी काही फिलअप करायची अशा भावना केल्या आणि चेक परत घेतले. ड्रॉप बॉक्सला ठेवताना त्यांनी फ्रॉड केले आणि हे चेक स्वतःच्या हातात घेऊन इतर ठिकाणी वापरून पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतले आहेत." या प्रकरणी मॅनेजर्सना विजापूरनाका पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले असून, फिर्याद दाखल करून पुढील तपास होईल.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















