एक्स्प्लोर
Dombivli Palava City Security Guard | अल्पवयीन मुलांना मारहाण, गुन्हा दाखल
डोंबिवलीतील पलावा सिटीमधील कासाबेला गोल्ड सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मुलं फुटबॉल खेळत असताना त्यांचा चेंडू इमारतीत गेल्याने सुरक्षा रक्षक राजेंद्र खंडारे यांनी त्यांना मारहाण केली. मुलांचे हात रुमालाने बांधून त्यांना शिवीगाळ केल्याचे मुलांनी सांगितले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. मानपाडा पोलिसांनी सुरक्षा रक्षक राजेंद्र खंडारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "दोन्ही मुलांच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन येथे सदर सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सदर सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेवून त्याला नोटीस देण्यात आलेली आहे." या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















