एक्स्प्लोर
Mumbai Metro Line 3 Aqua Line: दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी अंडर ग्राउंड मेट्रो स्टेशन कसं दिसतं?; पाहा Photo
Mumbai Metro Line 3 Aqua Line: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.
Mumbai Metro Line 3 Aqua Line
1/13

Mumbai Metro Line 3 Aqua Line: मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार आहे.
2/13

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In Mumbai) मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या (Mumbai Metro Line 3) अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.
3/13

मेट्रो लाईन 3 आचार्य अत्रे चौक (वरळी) आणि कफ परेड यांना जोडणार आहे.
4/13

दरम्यान, मेट्रो लाईन 3 मधील गिरगाव, काळबादेवी स्थानकाचे फोटो समोर आले आहे.
5/13

मुंबईच्या इतिहासातील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो लाईन म्हणजेच लाईन-3. ही लाईन संपूर्ण 33.5 किमी लांबीची असून पूर्णपणे अंडरग्राउंड आहे.
6/13

हा प्रकल्प मुंबईला जागतिक दर्जाच्या अंडरग्राउंड मेट्रो असलेल्या शहरांच्या यादीत आणणार आहे.
7/13

या मेट्रो लाईनची एकूण लांबी 33.5 किलोमीटर आहे, ज्यामध्ये कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान 27 स्थानके आहेत.
8/13

पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आरे-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ते कफ परेड हे अंतर काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
9/13

प्रत्येक स्थानकात अनेक प्रवेशद्वारे, अपंगांसाठी रॅम्प आणि लिफ्ट्स, तसेच आधुनिक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
10/13

सीसीटीव्ही आणि डिजिटल साईनेजच्या मदतीने प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात आली आहे.
11/13

कफ परेड ते आचार्य अत्रे चौक हे अंतर आता काही मिनिटांत पूर्ण होणार आहे, ज्यामुळे वेळ आणि उर्जेची बचत होईल. यामुळे दरवर्षी सुमारे 2.61 लाख टन CO₂ उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे.
12/13

‘वन नेशन, वन कार्ड’ – या योजनेअंतर्गत प्रवासी एकाच कार्डद्वारे मेट्रो, बेस्ट बस, लोकल ट्रेन, मोनोरेलमध्ये प्रवास करू शकतील. भाडं ₹10 ते ₹70 दरम्यान असून सर्वसामान्यांसाठी परवडणारे आहे.
13/13

नवीन तंत्रज्ञान आणि पूरक सेवा वापरून प्रवाशांना दर 5 मिनिटांनी मेट्रो सेवा मिळणार आहे. ही लाईन इतर मेट्रो प्रकल्पांशी जोडली जाणार असून, मुंबईसाठी एक एकात्मिक सार्वजनिक वाहतूक जाळं तयार होणार आहे.
Published at : 08 Oct 2025 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























