एक्स्प्लोर

Coronavirus | ड्युटीवरील पोलिसांनाही PPE किट द्या, हायकोर्टात याचिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ड्युटीवरील पोलिसांनाही PPE किट द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसंच संपूर्ण पगारासोबत धोकादायक परिस्थितीत जादा मेहनत केल्याबद्दल स्वतंत्र भत्ताही लागू करा, असंही याचिकेत म्हटलं आहे

मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यात आघाडीवर असलेल्या पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. याचसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही PPE किट द्या, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण पगारासह त्यांना धोकादायक परिस्थितीत जादा काम केल्याबद्दल वेगळा भत्ता जाहीर करा, अशीही मागणी या याचिकेत केली आहे.

राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सरकारी अधिकाऱ्याच्या पगारात कपात करु नये जेणेकरुन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. पुण्यातील एक वकील तौसिफ शेख आणि सामाजिक कार्यकर्ता सतीश गायकवाड यांनी अॅडव्हकेट गणेश गुप्ता यांच्यातर्फे ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.

लॉकडाऊन लागल्यापासूनच दिवसरात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस दलाचे हाल अधिक बिकट झाले आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव फैलावत असताना रस्त्यांवर नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी करणाऱ्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या वस्त्यांच्या, सोसायटींच्या तसेच क्वॉरन्टाईन करण्यात आलेल्यांच्या हॉटेल आणि हॉस्पिटलच्या बाहेर ड्युटी करणाऱ्या तसेच व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुंबई पोलीस दलात कोरोनाचा केव्हाच शिरकाव झालाआहे. कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 49 वर पोहोचली आहे. ज्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचाही समावेश आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांना मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर पुरवण्यात आले आहेत. मात्र या गोष्टी पुरेश्या नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ड्युटीवर तैनात असणाऱ्या पोलिसांची कोरोना चाचणी सक्तीची करावी आणि ती ठराविक कालांतराने होत रहावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. कारण एक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह निघाला की, त्याच्यासोबत 10-15 पोलिसांना घरी बसवावं लागतं. ज्यामुळे कामाचा ताण हा सहाजिकच इतर पोलिसांवर वाढतो.

त्यामुळे अश्या खडतर परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांना त्यांचा पूर्ण पगार देऊन सोबत धोकादायक परिस्थितीत काम केल्याबद्दल स्वतंत्र भत्ताही द्यावा. तसंच वैद्यकीय सेवेतील लोकांप्रमाणेच पोलिसांनाही PPE किट देण्यात यावेत. जेणेकरुन कोरोनाशी मुकाबला करण्यात आघाडीवर असलेल्या पोलिसांना दिलासा मिळेल आणि त्यांचं मनोधैर्य वाढेल, अशी मागणी हायकोर्टाकडे या याचिकेतून करण्यात आली आहे.

Maharashtra Police | आपल्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिसांचे जीव वाचवा, कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारासाठी निधी | स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget