एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रपती कोविंद यांचं तरुणांना मराठीत मार्गदर्शन
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक जनतंत्र परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपतींनी मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली.
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक जनतंत्र परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपतींनी मराठी मध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली.
“तरुणांनी उद्यमशीलतेकडे वळून स्वावलंबी बनावं. सरकारच्या तरुणांसाठी अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेत आजचे तरुण उद्योगाकडे वळतील,” असा विश्वास राष्ट्रपतींनी या परिषदेत व्यक्त केला.
भाईंदरमधील केशवसृष्टीमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या परिषदेला ठाणे, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेंचर कॅपिटल फंड, स्टार्ट अप या योजनांचा लाभ घेतलेल्या 200 उद्योजकांनी उपस्थिती लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement