एक्स्प्लोर
Advertisement
अपयश झाकण्यासाठी इतर विषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न : प्रवीण दरेकर
राज्याचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पक्षाची भूमिका मांडली.
मुंबई : उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन अल्पमुदतीचं असलं तरी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात सरकारला महत्वाच्या विषयांवर जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष करणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. कोरोनाच्या उपाय योजनांसंदर्भात सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आलं आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातलंय तर ग्रामीण भागात संसर्ग वाढला असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राज्याचं पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी सरकारला विविध विषयांवर घेरण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडली आहे. कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं आहेत. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अतिप्रसंग ओढावलेत, अत्याचार झाला आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना 250 पत्रं पाठवून सूचना केल्या मात्र दुर्दैवाने चार ओळीचंही उत्तर आलेलं नसल्याचे दरेकर म्हणाले.
एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा गंभीर आरोप
अपयश झाकण्यासाठी इतरविषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न : दरेकर
आम्ही फक्त सरकारला कोंडीत पकडणार नाही तर मार्गदर्शक सूचना देऊन चुकी दुरुस्त करण्याची मागणी करणार आहोत. अजूनही सरकार अधिवेशन कसं घेणार याबाबत स्पष्टता नाहीय. चहापान नाही, माध्यमांना सामोरे जात नाहीत. याउलट सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून ड्रग्स आणि सेक्स रॅकेट, कंगना बाबतची सरकारची भूमिका या सर्व विषयांमुळे कोविडवरचा फोकस शिफ्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. अपयश झाकण्यासाठी इतर भावनिक विषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
Eknath Khadse | "नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान" एकनाथ खडसे लवकरच लिहिणार पुस्तक!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement