एक्स्प्लोर
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल
प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले.
ठाणे : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे तब्बल नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा पोलिस सेवेत दाखल झाले आहेत. शर्मा यांनी नुकताच पोलिस महासंचालक मुख्यालयातील नियंत्रण कक्षाचा पदभार स्वीकारला होता. आता त्यांची नियुक्ती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात करण्यात आली आहे. आज ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात त्यांनी आपला पदभार सांभाळला.
पोलिस दलात 1983 साली दाखल झालेले पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द कायम वादात राहिली. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती.
प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले. मात्र पोलिस अधिकारी वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांकडून सुपारी घेऊन प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांचे एन्काऊंटर करत असल्याचा आरोप होऊ लागला.
रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटकही करण्यात आली. मात्र 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली.
तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली.आता आजपासून प्रदीप शर्मा यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात आपला पदभार सांभाळला. आपल्याला पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, यासाठी शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. अनेक महिने शर्मा यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने ते राजकारणात प्रवेश करणार, अशीही जोरदार चर्चा होती. मात्र त्याआधीच गृहखात्याने शर्मा यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement