एक्स्प्लोर
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबई : मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज मुंबईत अनेक भागात भर दुपारी अंधार दाटून आला. त्यामुळे मुंबईत रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल संध्यकाळीदेखील ढग अचानक दाटून आले होते आणि जोरदार पाऊस बरसला होता. राज्यभरात सध्या परतीचा पाऊस अनेकांच्या जीवावर उठला आहे. काल एका दिवसात वीज पडल्यानं राज्यात 11 जणांचा बळी गेला आहे. तर आजही बारामती, शिर्डीमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे महत्वाचं काम असेल तरच भर पावसात घराबाहेर पडा. आजही हवामान खात्यानं मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, परतीच्या पावसानं अनेक भागात घरांसह, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
आणखी वाचा























