एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पीएनबी घोटाळा 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता

देशाला हादरवून सोडणाऱ्या पीएनबी घोटाळ्याची व्याप्ती 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पीनएबी बँकेचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई : देशाला हादरवून सोडणाऱ्या पीएनबी घोटाळ्याची व्याप्ती 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पीनएबी बँकेचे धाबे दणाणले आहेत. तर या घोटाळा प्रकरणात नीरव मोदीच्या कंपनीचा चीफ फायनान्शियल ऑफिसर विपुल अंबानीची आज सलग दुसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी सुरु आहे. महत्वाचं म्हणजे हा विपुल अंबानी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा चुलतभाऊ असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई करत मुंबईतल्या पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेला ठाळं ठोकलं आहे. याच शाखेत नीरव मोदी याने हा घोटाळा घडवून आणल्याचं समजतं आहे. तसंच या घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. देशभरात एकूण ३९ छापे टाकण्यात आले असून जवळपास ५ हजार ७९० कोटी जप्त करण्यात आलेत. एकट्या मुंबईत 10 ठिकाणी छापे टाकलेल्या छाप्यात २२ कोटी जप्त करण्यात आले आहेत. शिवाय आज ईडीनं पीएनबीच्या 13 अधिकाऱ्यांची चौकशी केली. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 360 कोटी रुपयाचा चुना लावणाऱ्या नीरव मोदी आणि गँगला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सढळ हाताने मदत केल्याचं समोर येत आहे.  बँकेचा माजी उपव्यवस्थापक आणि नीरवला पैशांचा स्त्रोत खुला करुन देणाऱ्या गोकुळनाथ शेट्टीनेच ही माहिती दिली आहे. घोटाळा कसा झाला? पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली आहे. नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्याने सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं हमीपत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

संबंधित बातम्या :

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

 

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

 

नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त

 

PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती

 

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

 

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

 

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल

 

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget