एक्स्प्लोर

Narendra Modi : कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक, शरद पवारांना माझं आव्हान आहे...; नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कवरील भाषणातील मोठे मुद्दे

Narendra Modi Mumbai Shivaji Park Speech :  संविधानाच्या आधारे देण्यात आलेले दलित आणि ओबीसींच्या आरक्षणाला मी कधीही धक्का लावू देणार नाही, ही मोदीची गॅरंटी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 

मुंबई: माझ्याकडे 10 वर्षाच्या रिपोर्ट कार्ड आहे, आणि पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आहे. पण इंडिया आघाडीकडे काय आहे? जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. त्यांची नजर ही महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावर आहे अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीवर केली. मुंबईकरांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं, त्यांचे प्रत्येक मत हे मोदींना जाणार असंही ते म्हणाले. यावेळी इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडणार असून भारत जगातला सर्वात बलशाली देश म्हणून उभारणार आहे असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

ज्यांचं वय हे 70 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्या रुग्णालायतील मोफत उपचाराची, जबाबदारी ही मोदीची असेल. 

भाजप सत्तेत आल्यानंतर मी देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली, येत्या काळात भारत तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था असणार आहे. 

मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार आहे. 

निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणे हे काही चणे खाण्याचं काम नाही. राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या 500 वर्षात जे काही झालं नाही ते मोदीने करून दाखवलं. 

काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाढून टाकलंय. 

काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं. 

दहा वर्षांपूर्वी कर्ज मिळणं हे किती अवघड होतं, आज सहजपणे कर्ज उपलब्ध होतंय. आज सर्वसामान्य लोकांनाही कर्ज मिळतंय, त्याची गॅरंटी ही मोदीची आहे. 

गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं. 

माझ्याकडे 10 वर्षाच्या रिपोर्ट कार्ड आहे, आणि पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आहे. पण इंडिया आघाडीकडे काय आहे? जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. त्यांची नजर ही महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावर आहे. 

काँग्रेसने संपत्तीवर वारसा कर लावण्याची तयारी सुरू केली आहे. तुम्ही कमावलेल्या संपत्तीतील 50 टक्के संपत्ती ही काढून घेऊन आपल्या व्होट बँकेला देण्याची तयारी काँग्रेसची आहे.

राहुल गांधींकडून सावरकरांवर कधीही बोलू नये असं राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी सांगावं, पण ते असं करू शकणार नाहीत. कारण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी हे पु्न्हा सावरकरांना शिव्या देणार.

ज्या कसाबने मुंबईकरांचा जीव घेतला त्याला हे क्लीन चिट देत आहेत. आपल्या लष्करावर टीका करत आहेत. 

इंडिया आघाडीवाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करत आहेत. आंबेडकर आणि संपूर्ण संविधान सभा ही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विरोधात होती. पण काँग्रेस आता धर्माच्या आधारावर आरक्षण देतंय. 

कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक, काँग्रेसवाले संविधान तोडणारे. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Embed widget