एक्स्प्लोर

Narendra Modi : दहशतवादाला गाढलं, अशक्य त्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवल्या, यापुढे माझा प्रत्येक क्षण भारतासाठी; शिवाजी पार्कमधून मोदींची गॅरंटी

Narendra Modi Mumbai Shivaji Park Speech : येत्या काळात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

मुंबई : ज्यांना राम मंदिर निर्माण होणं अशक्य वाटत होतं, ज्यांना 370 कलम हटवणं अशक्य वाटत होतं, त्यांच्या सर्व अशक्यतांना मी गाढून टाकलंय आणि नवीन भारत उभा केलाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षात देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. 

काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या 2047 सालचे ड्रीम घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठं असेल. 

भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेलेत. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती. मी असे काही पंतप्रधान पाहिलेत की, त्यांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी म्हटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधींजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसं असतं तर देश किमान पाच दशकं पुढे असता. या सत्ताधाऱ्यांनी देशाची पाच दशकं ही वाया घालवली. 

सन 2014 मध्ये ज्यावेळी काँग्रेस गेली, त्यावेळी भाजप सत्तेत आलं त्यावेळी देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. येत्या काही काळात देश जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक ताकद असणार आहे ही मोदींची गॅरंटी आहे.  

मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार आहे. निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणे हे काही चणे खाण्याचं काम नाही. 

राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या 500 वर्षात जे काही झालं नाही ते मोदीने करून दाखवलं. 

काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाढून टाकलंय. 

काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं. 

ज्यांना स्वाभिमानानं जगायचं असेल त्यांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. मतदानाला बाहेर पडताना आधी झालेले बाँब धमाका आठवा आणि मतदान करा. मोदीला बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget