एक्स्प्लोर
मुंबईत लोकलच्या 2 ऑक्टोबरपासून 60 नव्या फेऱ्या, गर्दीच्या वेळी कोणतीही फेरी नाही
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या लोकल प्रवाशांना खास भेट दिली आहे. येत्या दसऱ्यापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 60 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
मुंबई : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या लोकल प्रवाशांना खास भेट दिली आहे. येत्या दसऱ्यापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 60 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. उद्या रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबई दौऱ्यावेळी या लोकल्सचं लोकार्पण करतील. मात्र संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांसाठी कोणतीही लोकल न दिल्यानं मुंबईकरांची निराशा झाली आहे.
या नव्या लोकल विशेषत: गर्दीच्या वेळेत चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र रेल्वेनं जारी केलेल्या वेळापत्रकात संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोणत्याही लोकल न दिल्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरार पाचव्या मार्गिकेचे लोकार्पणही उद्या करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 32, तर मध्य रेल्वेवर लोकलच्या 28 नव्या फेऱ्या सुरु होणार आहेत. यामध्ये हार्बरवरील 14, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील 14 फेऱ्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मात्र लोकलच्या नव्या फेऱ्या नसतील.
रेल्वेमंत्र्यांची मुंबईकरांना दसरा भेट
हार्बर मार्गावर नव्या 14 फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. सध्या हार्बरवर 590 फेऱ्या चालवल्या जातात, त्या फेऱ्या आता 604 होतील.
ट्रान्सहार्बर मार्गावरही 14 जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्या ट्रान्सहार्बरवर 232 फेऱ्या चालवल्या जातात, त्या 246 होतील.
वडाळा रोडसाठीच्या फेऱ्या 40 वरुन 58 वर जाणार आहेत.
ठाणे-पनवेल लोकल 57 वरुन 66 होतील.
मध्य रेल्वेवर दररोज 1660 फेऱ्या होतात, त्या आता 1688 होतील.
हार्बर डाऊन
1 वडाळा रोड-बेलापूर सकाळी 08.22 वाजता
2 सीएसएमटी-वांद्रे सकाळी 08.30 वाजता
3 सीएसएमटी-पनवेल सकाळी 11.12 वाजता
4 वडाळा रोड- पनवेल दुपारी 12.31 वाजता
5 वडाळा रोड-पनवेल दुपारी 13.17 वाजता
6 वडाळा रोड-पनवेल दुपारी 13.58 वाजता
7 वडाळा रोड-पनवेल दुपारी 15.22 वाजता
8 वडाळा रोड- वाशी दुपारी 15.50 वाजता
9 वडाळा रोड- पनवेल संध्याकाळी 17.14 वाजता
10 सीएसएमटी- वाशी रात्री 20.13 वाजता
11 वडाळा रोड- बेलापूर रात्री 00.50 वाजता
कोणत्या लोकलचा मार्ग वाढवला
सीएसएमटी-बेलापूर सकाळी 08.29 ची लोकल पनवेलपर्यंत धावेल
कोणत्या लोकल रद्द
सीएसएमटी-वांद्रे सकाळी 04.42 ची लोकल
वाशी-पनवेल सकाळी 05.48 ची लोकल
सीएसएमटी-बेलापूर सकाळी 06.12 ची लोकल
सीएसएमटी-वाशी दुपारी 13.06 ची लोकल
हार्बर अप
जादा लोकल
1 वाशी-वडाळा लोकल सकाळी 04.25 वाजता
2 वाशी-सीएसएमटी लोकल सकाळी 4.50 वाजता
3 पनवेल-वडाळा रोड सकाळी 07.09 वाजता
4 वांद्रे-सीएसएमटी सकाळी 09.09 वाजता
5 पनवेल-वडाळा रोड दुपारी 12.49 वाजता
6 पनवेल-वडाळा रोड दुपारी 14.13 वाजता
7 पनवेल-वडाळा रोड दुपारी 14.41 वाजता
8 वाशी-वडाळा रोड दुपारी 16.35 वाजता
9 बेलापूर-सीएसएमटी संध्याकाळी 18.56
वाढवण्यात आलेल्या लोकल
वाशी-सीएसटीएम संध्याकाळी 19.12 ची लोकल बेलापूरपासून धावेल
रद्द झालेल्या लोकल
पनवेल-बेलापूर रात्री 00.15 ची लोकल
वांद्रे-सीएसएमटी सकाळी 04.10 ची लोकल
ट्रान्स हार्बर डाऊन
जादा लोकल
1 ठाणे-वाशी सकाळी 10.35 वाजता
2 ठाणे-नेरुळ दुपारी 12.35 वाजता
3 ठाणे-पनवेल दुपारी 14.36 वाजता
4 ठाणे-पनवेल दुपारी 16.24 वाजता
5 ठाणे-नेरुळ संध्याकाळी 18.29 वाजता
6 ठाणे-नेरुळ संध्याकाळी 19.38 वाजता
7 ठाणे-वाशी रात्री 23.09 वाजता
मार्ग वाढवण्यात आलेल्या लोकल
ठाणे-नेरुळ दुपारी 15.57 ची लोकल पनवेलपर्यंत धावेल
ठाणे-नेरुळ संध्याकाळी 19.55 ची लोकल पनवेलपर्यंत धावेल
ट्रान्सहार्बर अप
जादा लोकल
1 पनवेल-ठाणे सकाळी 07.43 वाजता
2 नेरुळ-ठाणे सकाळी 09.29 वाजता
3 वाशी-ठाणे सकाळी 11.13 वाजता
4 नेरुळ-ठाणे दुपारी 13.14 वाजता
5 पनवेल-ठाणे संध्याकाळी 17.57 वाजता
6 नेरुळ-ठाणे संध्याकाळी 19.08 वाजता
7 वाशी-ठाणे रात्री 23.09 वाजता
मार्ग वाढवण्यात आलेल्या लोकल
1 बेलापूर-ठाणे सकाळी 05.09 ची लोकल पनवेलपासून सुटेल
2 नेरुळ-ठाणे दुपारी 16.35 ची लोकल पनवेलपासून सुटेल
3 नेरुळ-ठाणे संध्याकाळी 17.29 ची लोकल पनवेलपासून सुटेल
पश्चिम रेल्वे
जादा लोकल अप
जादा लोकल डाऊन
मार्ग वाढवण्यात आलेल्या लोकल
नव्या 15 डब्यांच्या लोकल्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement