एक्स्प्लोर
टाटा समूहाच्या मुख्यालयाबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण
![टाटा समूहाच्या मुख्यालयाबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण Photographers Beaten Up In Front Of Tata Group Headquarters Bombay House टाटा समूहाच्या मुख्यालयाबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/04173943/tatav-6-580x395.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर तीन वृत्तपत्रांच्या फोटोग्राफरना बेदम मारहाण करण्यात आली. बॉम्बे हाऊस हे टाटा समूहाचं मुख्यालय आहे.
'मिड डे'चे ज्येष्ठ फोटोग्राफर अतुल कांबळे, 'टाइम्स ऑफ इंडिया'चे शांतकुमार आणि 'हिंदुस्थान टाइम्स'चे हरजित सिंह यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहे.
बॉम्बे हाऊसबाहेर अनेक वृत्तपत्रांचे पत्रकार आणि फोटोग्राफर होते. फोटोग्राफर्सना रतन टाटा आणि सायरस मिस्त्रींचे फोटो काढायचे होते. मात्र बॉम्ब हाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केली. याशिवाय त्यांच्या कॅमेऱ्याचंही नुकसान झालं आहे.
पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दरम्यान, सायरस मिस्त्री यांना नुकतंच टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा एकदा चेअरमनपदाची धुरा सांभाळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)