...म्हणून डोंबिवलीत आज 1 रुपया लीटर पेट्रोल
शिवसेनेचा उपक्रम सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे.

डोंबिवली : पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. वाढणाऱ्या या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासंच झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आजच्या घडीला 102 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे.
इंधनाचे अवाक्याबाहेर गेलेले दर पाहता आता सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्यात येत असून, हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने म्हणजेच 13 जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या प्रमाणानं विकलं जाणार आहे.
निर्धारित कालावधीत येणाऱ्या ग्राहकांनाच 1 रुपयात एक लीटर पेट्रोल देण्यात येणार आहे. कल्याण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत 1 रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अंबरनाथमध्ये युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी देखील अंबरनाथ पश्चिमेकडील येथील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी 50 रुपये लीटरने पेट्रोल देण्यात येणार आहे.
PM Modi G7 Speech: जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, व्हर्चुअली सहभाग
निमित्त आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं असलं तरीही याच कारणानं काही प्रमाणात का असेना पण, सर्वसामान्य वाहनधारकांना पेट्रोल दरांमध्ये किमान दिलासा मिळणार हे नक्की.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















