एक्स्प्लोर

PM Modi G7 Speech: जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, व्हर्चुअली सहभाग

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले.  यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले.  यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'वन अर्थ वन हेल्थ' चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल  यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.  

12 आणि 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन भाषणं (PM Modi Speech Live) या समिटमध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे G7 समिटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाले आहेत. याआधी 2019 साली फ्रांसमध्ये झालेल्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. 

सूत्रांनी सांगितलं की या बैठकीत फ्रांसचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी भारतासह अन्य देशांना कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करताना त्यात सूट देण्याची मागणी केली.  त्यांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी हटवण्याचीही मागणी केली. लस बनवणाऱ्या देशांना कच्चा माल मिळायला हवा, असं ते म्हणाले.  

लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रिताच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं होतं. जी-7 राष्ट्रांची यावर्षीची बैठक ही ब्रिटनमधील कॉर्नवल या ठिकाणी होत आहे. ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आपल्या निवेदनात भारताला 'जगाची फार्मसी' अशी उपमा दिली होती. तसेच कोरोना लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही करण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, "भारत जगातील 50 टक्क्यांहून जास्त लसींची निर्मीती करतोय. ब्रिटन आणि भारताने या कोरोनाच्या संकटाचा सामना एकत्रितपणे केला आहे."

G-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना ब्रिटनचे आमंत्रण, त्यापूर्वी बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा शक्य

यावेळी  G7 मध्ये कोरोना व्हायरस, फ्री ट्रेड आणि पर्यावरण या विषयांवर विस्ताराने चर्चा होणार आहे. कोरोना महामारीतून जगाला कसं सावरायचं हा विषय केंद्रस्थानी असणार आहे.  या बैठकीत वातावरण बदल आणि इतर महत्वाच्या विषयावर देखील चर्चा होणार आहे. जी-7 राष्ट्रांचा गट हा जगातील सर्वाधिक विकसित राष्ट्रांचा गट असून त्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे.

2020 मध्ये कोरोनामुळं G7 बैठक रद्द केली होती. भारताकडून पंतप्रधान मोदी यांच्या आधी मनमोहन सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील G7 मध्ये सहभाग घेतला होता. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये या परिषदेत सहभाग घेतला होता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे 2005 ते 2009 असे सलग पाच वर्ष या परिषदेत सहभागी झाले होते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget