एक्स्प्लोर
पेट्रोलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला!
मुंबईत पेट्रोल 81 रुपये 93 पैसे, तर डिझेल 69 रुपये 54 पैसे इतकं झालं आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने, भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत.
पेट्रोलमध्ये 1 पैसे आणि डिझेलमध्ये 4 पैसे अशी नाममात्र वाढ झाली असली, तरी ही दरवाढ गेल्या 55 महिन्यांतील सर्वोच्च आहे.
त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल 81 रुपये 93 पैसे, तर डिझेल 69 रुपये 54 पैसे इतकं झालं आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल 74.08 रुपये लिटर आहे. सप्टेंबर 2013 नंतर ही सर्वोच्च दरवाढ आहे.
तिकडे कोलकात्यात पेट्रोल 76, चेन्नईत 76.78 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
डिझेल दरानेही मोठी मजल मारली आहे. दिल्लीत डिझेल 65.31, कोलकात्यात 68.01, मुंबईत 69.54 आणि चेन्नईत 68.9 रुपयांवर पोहोचलं आहे.
दरवाढीचं कारण
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्याचे दर 2014 च्या तुलनेत जास्त आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे.
येत्या काळात अमेरिकेने इराणवर काही निर्बंध लादले, तर पुरवठा आणखी घटेल आणि त्याचा फटका बसून, आणखी दरवाढ होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement