एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीत प्रवाशांचा उद्रेक, भाडं नाकारल्याने रिक्षा अडवल्या
डोंबवली : रिक्षाचालकांनी भाडं नाकारण्याचे प्रकार प्रवाशांसाठी नवीन नाहीत. घाई-गडबड असल्याने नेहमीच हे प्रकार दुर्लक्षित केले जातात. मात्र, आज यामुळे डोंबिवलीकरांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं.
डोंबिवलीच्या केळकर रोडवर स्कायवॉकखाली असलेल्या रिक्षास्टँडवर आज रात्री काही रिक्षाचालकांनी भाडी नाकरली. त्यामुळे प्रवाशांचा संयम संपला आणि प्रवाशांनी रिक्षाच रोखून धरल्या.
तब्बल अर्धा तास हा सगळा गोंधळ सुरू होता. रिक्षाचालकांच्या या मनमानीवर पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, प्रवाशांनी जरी संतापून रिक्षा अडवल्या असल्या तरी या मागच्या भावना तीव्र आहेत. रिक्षावाल्यांच्या मनमानीला चाप कधी बसणार, हा प्रश्न तसाच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement