माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने मुंबई विद्यापीठाला 25 हजारांचा दंड
मुंबई विद्यापीठ पूर्णमूल्यकनासाठी आणि फोटोकॉपीसाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून दरवर्षी जमा करते. मात्र त्याबदल्यात किती खर्च विद्यापीठाकडून केला जातो हे समोर आल्यास या प्रक्रियेतून साधारण विद्यापीठाला किती फायदा होतो, हे समोर येईल.
मुंबई : माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला दंड ठोठावला आहे. विद्यापीठाकडून 2010 ते 2017 दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती मागवण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 यावर्षात उतरपत्रिकांच्या पुनर्मुल्याकणासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम आणि पुनर्मुल्याकनासाठी होणार एकूण खर्च याबाबतची माहिती माहिती अधिकारातून मिळावी, यासाठी अपील केलं होतं.
मात्र, विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा माहिती मागविण्यासाठी आकाशने राज्य माहिती आयोगाकडे अपील केलं. तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने 25 हजार रुपयाचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला आहे. तसेच कुलगुरुंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुंबई विद्यापीठ पूर्णमूल्यकनासाठी आणि फोटोकॉपीसाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून दरवर्षी जमा करते. मात्र त्याबदल्यात किती खर्च विद्यापीठाकडून केला जातो हे समोर आल्यास या प्रक्रियेतून साधारण विद्यापीठाला किती फायदा होतो, हे समोर येईल.
मुंबई विद्यापीठ पुनर्मुल्याकनासाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून घेते. मात्र पुनर्मुल्याकन आणि फोटोकॉपीसाठी होणारा खर्च लाखांमध्ये आहे. मग बाकीचे पैसे कुठे जातात? असा प्रश्न अनेक विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला होता.