एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओला-सुका कचरा वेगळा न केल्यास दंड, केडीएमसीची नोटीस
शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून केडीएमसीने ही नोटीस बजावली आहे. घनकचरा अधिनियम 2016 मध्ये असलेल्या तरतुदींनुसार शहरातील 10 हजार सोसायट्यांना केडीएमसी प्रशासनाने या नोटीस बजावली आहे.
कल्याण : कल्याण शहरात तयार होणारा कचरा ओला-सुका असा वेगळा करुन दिला नाही, तर दंड ठोठावू, असा इशारा केडीएमसी आयुक्तांनी दिला आहे. याबाबत कल्याण-डोंबिवलीतील 10 हजार सोसायट्यांना केडीएमसीने नोटीस पाठवली आहे.
शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून केडीएमसीने ही नोटीस बजावली आहे. घनकचरा अधिनियम 2016 मध्ये असलेल्या तरतुदींनुसार शहरातील 10 हजार सोसायट्यांना केडीएमसी प्रशासनाने ही नोटीस बजावली असून ओला-सुका कचरा वेगळा वेगळा करुन दिला नाही, तर या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
याशिवाय या सोसायट्यांचा कचरा उचलणंही केडीएमसीकडून बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा निर्णय योग्य असला, तरी नागरिकांमधून मात्र याला तीव्र विरोध होत आहे. ओला-सुका कचरा आम्ही वेगळा करुन दिला, तरी डम्पिंग ग्राउंडवर मात्र सगळा कचरा एकत्रच टाकला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
तर केडीएमसीने कचऱ्याची वर्गीकरण करुन विल्हेवाट लावण्यासाठी यापूर्वीही एक ठेकेदार नेमला होता. त्याने काय काम केलं, हे पाहण्याऐवजी नागरिकांना कारवाईचे इशारे देणं योग्य नसल्याचं मत माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केलं आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतही कचऱ्यासंबंधीच्या 100 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पैसे देऊनही केडीएमसीचा ठेकेदारावर विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रिकेट
Advertisement