एक्स्प्लोर

जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

दोन दिवसापूर्वी कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून आयुक्त खांडेकरला अटक केली होती.

जालना : महापालिका आयुक्तांना चक्क 10 लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, जालन्यातील महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर  याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून न्यायालयाकडे जामीनासाठी केलेला अर्ज कोर्टाने (Court) फेटाळून लावला आहे. त्यामुळे, जालना (Jalna) महापालिका आयुक्त महोदयांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. एका कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महपालिका आयुक्तांना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर, त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले होते. 

दोन दिवसापूर्वी कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून आयुक्त खांडेकरला अटक केली होती. या प्रकरणी आरोपी खांडेकरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, आज अंबड येथील सत्र न्यायालयाने खांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, आयुक्त महाशयांनी तात्काळ आपला जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, अंबड न्यायालयाने आरोपी लाचखोर आयुक्तांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराकडून कामाचे बिल पास करण्यासाठी तब्बल 10  लाख रुपयांची लाच देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती. यावेळी शासकीय निवासस्थानी 10 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ त्यांना पकडले होते. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. संतोष खांडेकर यांच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात आली आहे. या घटनेनं जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

आयुक्तांना अटक होताच  फोडले फटाके 

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या अटकेनंतर जालन्यात कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला. जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी  बांधकामाचे बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा लाखाची लाच मागितली होती, यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केलं. यानंतर काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला, तसेच एसीबी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा

आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे! कोर्टाबाहेरील गोळीबाराने खळबळ; पोर्शे अपघात ते कोमकर-आंदेकर गँगवार, गेल्या तीन वर्षात पुण्याला हादरवणाऱ्या 10 गुन्हेगारी घटना
पुणे तिथे गुन्हेच गुन्हे! कोर्टाबाहेरील गोळीबाराने खळबळ; पोर्शे अपघात ते कोमकर-आंदेकर गँगवार, गेल्या तीन वर्षात पुण्याला हादरवणाऱ्या 10 गुन्हेगारी घटना
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget