एक्स्प्लोर
Maharashtra Politics: दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडणार, ठाण्यात ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार?
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर मोठे विधान केले आहे. 'या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकर्या', असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र लढून 'पंचाहत्तर पार' जागा जिंकू, असे भाकीतही त्यांनी केले. राऊतांच्या या घोषणेनंतर स्थानिक मनसे नेत्यांनी दुजोरा दिला असून कार्यकर्त्यांची मनं जुळल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाने राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. महायुतीमध्येही भाजप 'छप्पा छप्पा भाजपचा' नारा देत असल्याने बिघाडीचे चित्र आहे. राऊतांच्या या एकतर्फी घोषणेमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला असून, अद्याप युती किंवा आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















