एक्स्प्लोर
मनसेचा दीपोत्सव,नात्याचा उत्सव, उद्धव ठाकरे- राज ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये, ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण
मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं मातोश्री आणि शिवतीर्थमधल्या मनोमिलनाचा सोहळालाही पाहायला मिळाला. शिवाजी पार्कवरच्या याच दीपोत्सवाची ही क्षणचित्रे पाहूयात.
मनसेचा दीपोत्सव नात्यांचा उत्सव
1/10

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवानं ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. दिवाळीच्या पहिला दिवशी दीपोत्सवाला सुरुवात करण्याची मनसेची परंपरा...यंदा या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे हजर होते.
2/10

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला. मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं. ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा आज दिसून आला.
Published at : 17 Oct 2025 10:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























