एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात
मुंबई : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज थेट जे जे रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली.
छगन भुजबळ यांची शनिवारी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तुरुंगातून जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
15 सप्टेंबरपासून भुजबळांना प्रचंड ताप असून, त्याचं संपूर्ण अंग दुखतं आहे. मदतीशिवाय भुजबळांना दोन पावलेही चालता येत नसल्याची माहिती मिळते आहे.
प्लेटलेट्स कमी झाल्या असून, ब्लडप्रेशर 104/55 इतकं आहे. प्रचंड दम लागणे, झोप न लागणे, छातीत कळ येणे असेही त्रास भुजबळांना होत आहेत.
जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन भुजबळांची तपासणी केली आणि रुग्णालयात अॅडमिट करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज पंकजा मुंडे यांनी जे जे रुग्णालयात धाव घेतली.
संबंधित बातमी
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जे. जे. रुग्णालयात दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement