एक्स्प्लोर
पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर
कंपनीत एकूण नऊ कामगार रात्रपाळीत काम करत होते.

पालघर : तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एन 154 च्या वर्षा ऑरगॅनिक्स केमिकल कंपनीत मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटा दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर बेपत्ता झालेले सहा कामगार सुरक्षित असल्याची माहिती बोईसर पोलिसांनी दिली आहे.
कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे आसपासचा पाच किलोमीटरचा परिसर हादरला. यामध्ये दोन कामगार गंभीर भाजले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
परंतु वेळेवर अॅम्ब्युलन्सची सुविधा न मिळल्याने जखमी कामगारांची फरफट झाली. एका जखमीला पोलिस व्हॅनमधून तर दुसऱ्याला फायर ब्रिगेडच्या गाडीतून मालाडच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
कंपनीत एकूण नऊ कामगार रात्रपाळीत काम करत होते. दोन जखमींसह आणखी एक कामगार सापडला. परंतु सुरुवातीला उर्वरित सहा कामगार बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र या सहा कामगारांनी घाबरुन पळ काढला होता. ते सुरक्षित आहेत, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement



















