एक्स्प्लोर

पालघर : कडेकोट बंदोबस्तात 2097 केंद्रांवर मतदान होणार!

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 2097 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

पालघर : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्षामुळे सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 2097 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबत माहिती दिली. मतदान सोमवार 28 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तर मतमोजणी 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. या पोटवडणुकीसाठी 12 हजार 894 कर्मचारी, तसेच 4 हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे. पालघर जिल्ह्यातील 2097 केंद्रांपैकी 14 केंद्रांना संवेदनशील असे नमूद करण्यात आलं आहे. या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचं अधिक लक्ष राहणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तालुकानिहाय मतदान केंद्र पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. संवेदनशील मतदान केंद्र यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (63), बोईसरमधील बोईसर (34), धोंडीपूजा (85), खैरपाडा (294) तसेच वळीवमधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड आणि 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले  आहेत. मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, 7 हजार 737 मतदान अधिकारी आणि दोन हजार 308 शिपाई यांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे. मतमोजणीची तयारी सर्व मतदारांना 2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदार चिठ्ठ्यांचे ( Voter Slip) वाटप करण्यात  येत आहे. मतदान झाल्यानंतर EVM आणि VVPAT  मशिन संबधित विधानसभा मतदारसंघ मुख्यालयाच्या स्टाँग रुममध्ये जमा करण्यात येतील. त्यांनतर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हे मशिन  पालघर येथील सुर्या कॉलनीमधील जिल्हा स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येतील. पालघर येथे 31 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्वर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत असतील, अशी माहिती नारनवरे यांनी दिली. पालघर पोटनिवडणूक भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget