एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरमधील कंपनी मालकाचं अपहरण आणि हत्या प्रकरण : फरार आरोपीची आत्महत्या
9 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास पालघर येथील जुना सातपाटी रोड येथून आरिफ यांचे अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर प्रत्यक्षदर्शींच्या तक्रारीनुसार पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पालघर : पालघरमधील अल्फा मेटल कंपनी मालकाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील एका फरार आरोपीने आत्महत्या केली आहे. शिवा ठाकूर या फरार आरोपीने त्याच्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या प्रकरणातील अटकेत असलेल्या चार आरोपींना 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चार ते पाच आरोपी फरार होते. त्यापैकीच एक आरोपी शिवा ठाकूर होता. आरिफ अली यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट शिवा ठाकूरने (वय 35 वर्ष) बजावली होती.
कामगारांकडून मालकाचे अपहरण करुन हत्या
अपहरण आणि हत्या
9 मे रोजी अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली यांचं पालघरमधील जुना सातपाटी रोड इथून अपहरण झालं होतं. दुपारी दोनच्या सुमारास आरिफ यांची रिक्षा अडवून त्यांना बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून नेलं होतं. यानंतर आरिफ यांची हत्या करुन त्यांना जाळून फेकलं होतं. कामगारांनीच त्यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं.
महिलेसह चार आरोपींना अटक
पोलिसांनी या हत्या प्रकरणात एक महिला आणि तीन पुरुषांसह चार आरोपींना अटक केली. आरिफ मोहम्मद अली यांच्या कंपनीतील कामगार ठेका असलेल्या प्रशांत संखे, रामदेव संखे यांना वापीमधून तर प्रशांत महाजनला जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधून अटक करण्यात आली होती. तर स्मिता शेट्टी या महिलेला विरारमधून अटक केली होती. त्यांना 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यावसायिक वादातून अपहरण करुन हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
शिवा ठाकूरची भूमिका
आरिफ मोहम्मद अली यांचं अपहरण आणि हत्या ही "प्री प्लॅन" होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत संखेने अनेक दिवसांपासून याची तयारी केली होती. अपहरणासाठी टेम्भोडे इथल्या चार मुलांना आमिष दाखवत संखेने त्यांना तयार केलं. शेख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांनी आपल्या बचावासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांचे नाक-तोंड दाबून ठार मारलं. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रशांत संखेने बिरवाडीमधील शिवा ठाकूरची मदत घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह जाळण्यासाठी लागणारं डिझेल आणि अन्य साहित्याचा पुरवठा शिवा ठाकूरने केली होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्याने शिवा ठाकूर फरार होता. या खून प्रकरणात अटकेच्या भीतीने शिवा ठाकूरने बुधवारी (15 मे) एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement